नांदेडमहाराष्ट्र

Dainik Gavkari : दैनिक गावकरीने प्रकाशित केलेल्या पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

नांदेड| महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दैनिक गावकरीने प्रकाशित केलेल्या महाशिवरात्री विशेष पुरवणीचे प्रकाशन मंदिर कमेटीसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक गांवकरीने श्री परमेश्वर मंदिराबाबत छापलेल्या सविस्तर लेखाचं उपस्थित मान्यवरांसह अनेकांनी भरभरून कौतूक केल आहे.

IMG 20250227 170641 Dainik Gavkari : दैनिक गावकरीने प्रकाशित केलेल्या पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

गेल्या अनेक वर्षांपासून महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अनिल मादसवार हे मंदिराचे संचालक पद सांभाळत डिजिटल, प्रिंट मीडियासह वेगवेगळ्या माध्यमातून श्री परमेश्वर देवाची महिमा आख्यायिका दूरदूरपर्यंत प्रसारित करण्याचे काम करत आहेत. महाशिवरात्री यात्रेच्या सुरुवातीपासून प्रकाशित केलेल्या बातम्यांमुळे भाविक भक्तांची होऊ लागलेली अफाट गर्दीमुळे श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेला रंग चढु लागल्याने दिसुन आले आहेे. महाशीवरात्रीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

IMG 20250227 170712 Dainik Gavkari : दैनिक गावकरीने प्रकाशित केलेल्या पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन महाशिवरात्रीचे औचित्य साधून दैनिक गांवकरी ने हेमाडपंथी श्री परमेश्वर मंदिराबाबत छापलेल्या विषेश पुरवणीच प्रकाशन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकारांनी प्रशंसा करून दैनिक गावकरीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सेक्रेटरी अनंतराव देवकते, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, सोपान बोम्पीलवार, मारोती वाडेकर, दत्ता पोपलवार, प्रवीण कोमावार, रामराव पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, उदय देशपांडे, केदार ताटेवाड आदींसह अनेक नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!