हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे कामारी गाव व परिसरात ऊस, गहू व इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी डुकरांसह इतर वन्यप्राण्यांचा उपद्रव खूपच वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. हि बाब लक्षात घेता गावातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा मिळावा अशी मागणी शेतकरी या नात्याने गणेश देवराये यांनी सोशल मीडियातून केली असून, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.


हिमायतनगर तालुका हा सिंचनाच्या बाबातीत अजुणही मागासलेला आहे. शासनाकडून विविध प्रकलप राबविले जात असताना देखील त्याचा म्हणावा तास अफायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी नेहमीच आर्थिक संकटाचा सामना करतच आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई तर पावसाळ्यात पुरस्थितीने हैराण होऊन शेतीच्या नुकणीला सामोरे जातो आहे. या नुकसानीपोटी थोडीफार मदत शासनाकडून होत असली तरी यातून काहीच होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरंय अर्थाने समृद्ध करण्यासाठी सिणचनाची व्यवस्था आणि यासाठी लागणार वीजपुरवठा अत्यंत आवश्यक आहे. या भागात कैनॉल आले असले तरी कैनॉलची मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळत नाही. कामारी विल्सन पर्यंत पाणी आले तरी पुढील भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न जैसे ठेच आहे. यासाठी कैनॉलची लांबी वाढून दक्षिण भाग सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.



गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली लोकसेडिंग आणि शेतकऱ्यांना केवळ रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. रात्रीच्या वीजपुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागत असल्यामुळे ऊस, गहू, सूर्यफूल यासह अन्य पिकांना पाणी देताना अपघातांची शक्यता वाढली आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यातील ग्रामदिन भागात विशेषतः कामारी गावात व परिसरात काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांवर डुकरांचे प्राण घातक हल्ले होत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असून, डुकरांच्या वावरामुळे गटारीला घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे महावितरण विभागाने शेतकऱ्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी दिवस वीजपुरवठा द्यावा जेणेकरून शेती करणे सुलभ होईल अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.




