लोहा| लोहा शहर व बेनाळ वाडी तांडे या संपूर्ण भागात ड्रेनेज होणार असून पाणी पुरवठा योजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे त्याची टेस्टिंग घेतल्या नंतर शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते सिमेंटचे होणार आहेत तसेच पोलीस ठाण्याच्या प्रलंबित इमारतीचे काम, लगतच्या जागेत बीओटी तत्वावर कॉम्प्लेक्स, सुनेगाव तलावा लगत गार्डन, क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकारण यास विविध विकास कामासाठी ६६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच मुंबई येथे शहराच्या विकासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे .या शहरातील जनतेनी आपणास नेहमीच साथ दिली आहे. शहराच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण करू अशी ग्वाही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.

लोहा शहर विकास आढावा बैठक आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर पालिका सभागृहात पार पडली.यावेळी माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, माणिकराव मुकदम, राष्ट्रवादी कोंग्रेसचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, पोलीस निरीक्षक आयलाने, बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहनराव पवार, अभियंता सोमवंशी, जि प बांधकाम उपअभियंता शिवाजी राठोड, महावितरण उपअभियंता श्री सुतार, अभियंता स्वामी, बीडीओ श्री कुळकर्णी, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल ,दता वाले, करीम शेख, हरिभाऊ चव्हाण, भास्कर पाटील, बालाजी खिल्लारे, पंचशील कांबळे, जीवन पाटील, बाबुराव डोम, बी डी जाधव, इमाम लदाफ, शहर अभियंता शरद राहेरकर, कार्यालयीन अधीक्षक कठारे, सुतार, केंद्रे, उल्हास राठोड स्वच्छता विभाग, घरकुल, पाणीपुरवठा यासह सर्व विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

आ प्रतापराव पाटील यांनी घरकुल योजनेत ज्याना अजून अनुदान मिळाले नाही त्याचे अनुदान लवकर प्राप्त व्हावे यासाठी वरिष्ठांशी बोलून हा प्रश्न मार्गी काढणार आहे शहरात वर्दळीच्या भागात स्वछता गृह उभारण्याच्या सुचना दिल्या.दहा दिवसांत शहरातील नाल्या सफाईचे काम व्हावे , रमाई घरकुल योजनेत अनुदान मिळाले नाही त्याचा प्रश्न मार्गी लावा असा सूचना त्यांनी मुख्याधिकारी यांना दिल्या.



शहर वाडी ताडे बेनाळ या भागात ड्रेनेज ,पाणी पुरवठा लाईन ,त्यानंतर सर्वच प्रमुख व अंतर्गत सिमेंट रस्ते करण्यात येणार आहेत.सुनेगाव तलाव लगत जागेवर उद्यान प्रस्तावित असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी याच्याकडे जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक होईल, नवीन क्रीडा संकुल व्हावे यासाठी तहसीलदार यांनी जागा द्यावी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, बुद्ध विहाराला कंपाउंड वॉल, शादीखाना असा विविध विकास कामासाठी ६६३ कोटी रुपयांचे प्रस्तवा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

मुंबईत लवकरच लोहा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा याच्या उपस्थिती अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.शहरातील जनेतेंनी आपणास नेहमीच साथ दिली आहे विकासासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार प्रतापराव पाटील यांनी दिली उपस्थित नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण त्यांनी केले.व संबंधितांना सूचना दिल्या. माणिकराव मुकदम, बी डी जाधव यांनी आमदार प्रतापराव पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आढावा बैठक घेतली त्याबद्दल आभार मानले.

