नांदेडमहाराष्ट्र

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड| महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.

या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 29 एप्रिल 2025 रोजीचे 00.00 वाजेपासून (28 एप्रिल 2025 चे मध्यरात्री 24.00 वाजेपासून) ते 3 मे 2025 च्या मध्यरात्री पर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.

संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

गाडेगाव येथे रेल्‍वे ओव्‍हर ब्रिज कामांमुळे वाहनांसाठी पर्यायी मार्ग
गाडेगाव येथील रेल्‍वे ओव्‍हर ब्रिजचे काम करण्‍यासाठी 20 एप्रिल ते 18 मे 2025 कालावधीत पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहने वळविण्‍यास जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मान्‍यता दिली आहे.

निळा जं.शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट हा मार्ग वाहनांसाठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. या मार्गासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येण्याकरिता) जड वाहनांसाठी शंकरराव चव्‍हाण चौक-बोंढार तर्फे हवेली-वाजेगाव-शिकारघाट-मुगट हा राहील. तर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी गाडेगाव-बोंढार तर्फे हवेली ते देगलूरनाका ग्रामीण मार्ग 37 हा राहील. वाहतुक वळविणे व पर्यायी मार्गाने सोडण्याबाबत अटी व शर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाची समक्रमांकित अधिसुचना 17 फेब्रुवारी 2025 मध्‍ये नमुद प्रमाणे कायम असतील, असेही आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

लेंडी प्रकल्प धरण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
लेंडी प्रधान प्रकल्प मुखेड तालुक्यातील मौ. गोणेगाव अंतर्गत लेंडी प्रकल्प धरण परीसर व धरण लगत असलेली मौ. गोणेगाव, रावणगाव, मारजवाडी, हसनाळ, भाटापुर व इटग्याळ (प.दे) या गावांच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

या गावांच्या हद्दीत लेंडी प्रधान प्रकल्पाची होत असलेली कामे, ये-जा करणारी यंत्रणा, साहित्य व अधिकारी-कर्मचारी यांना विरोध करणारी सर्व गतीविधीस, मोर्चे, धरणे, उपोषणे, आत्मदहन व त्याअनुषंगाने इतर जमाव करणे यांना 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 26 जून 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. संबंधीतास नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकुण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने, आणिबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 28 एप्रिल 2025 रोजी निर्गमीत केले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!