श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| राज्य शासनाच्या प्रधान सचिव अपील व सुरक्षा गृह विभाग तथा राज्याच्या पालक सचिव श्रीमती राधिका रस्तोगी (Mrs. Radhika Rastogi took darshan) यांनी दि.३० जून रोजी माहूर गडावर येऊन श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेत महाआरती केली, यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुका देवी संस्थानच्या सचिव मेघना कावली, धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार किशोर यादव यांचे सह विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव यांचे सह पुजारी मंडळीकडून त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.


राज्याच्या प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून या दौऱ्यात सुशोभीकरणाची कामे पर्यटन विकास, जिल्हा विकास आराखडा यासह इतर विकास कामांच्या पाहणी दौऱ्यातून वेळ काढत त्यांनी दि.३० जाने रोजी माहूर गडावरील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी विश्वस्त मंडळ तसेच पुजारी मंडळीकडून त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी यांनी माहूरगडावर सुरू असलेल्या लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामांची पाहणी केली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार किशोर यादव यांचे सह उपस्थित विश्वस्तासोबत विकास कामाबाबत चर्चा करून माहिती घेतली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव यांचे सह विश्वस्त आणि पुजार्यांनी ही त्यांचा सत्कार केला.
