लोहा। लोहा विधानसभा क्षेत्रातील १हजार ८१६ मतदान कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण १२ व १३ नोव्हेंबर निवडणूक निरीक्षक पल्लवी अकुरती याच्या उपस्थितीत पार पडले. चार सत्रात हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिले.अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांनी भेट दिली.
लोहा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचे दुसरे कर्मचारी प्रशिक्षण १२ व १३ तारखेला शासकीय विश्रामगृह समोरील के के मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत पार पडले .दुसऱ्या दिवशी अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांनी भेट दिली .निवडणूक प्रकिया नियमानुसार पार पाडावी.निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे व मार्गदर्शनाचे पालन करावे.प्रशिक्षण घेताना ज्या बाबीची अडचण असेल त्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे. मतदान प्रकिया सुरळीत पार पाडावी असे मार्गदर्शन केले.
निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी निवडणूक मतदान प्रकिया तसेच त्या दरम्यान करावयाची प्रकिया नोंदी याबाबत माहिती दिली. सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार परळीकर, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार गोरे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी प्रशिक्षण दिले. चार सत्रात प्रशिक्षण पार पडले त्यानंतर नारायण इंग्लिश स्कुल मध्ये ईव्हीएम प्रशिक्षण देण्यात आले.
कर्मचाऱ्यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षण १२ व १३ रोजी पार पडले निवडणूक निरीक्षक पल्लवी आकुरती याच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांनी भेट दिली मार्गदर्शन केले.निवडणूक तयारी तसेच प्रशिक्षण व्यवस्था पाहून निवडणूक निरीक्षक पल्लवी मॅडम व अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार व टीमचे अभिनंदन केले समाधान व्यक्त केले.