नांदेड| पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी अध्यात्मिक आनंद देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘प्रति पंढरपूर’ माऊली दिंडीच्या शोभायात्रे ने नांदेड मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण (‘Prati Pandharpur’ Mauli Dindi procession creates devotional atmosphere in Nanded) झाले. हजारो भाविकांचा सहभाग या शोभायात्रेत नोंदवला गेला.


नामदेव मंदिरात सुशोभित असलेल्या विठ्ठल रुख्माई आणि संत नामदेव महाराज यांची आरती झाल्यानंतर येथून शोभायात्रेची सुरुवात झाली. जुना मोंढा टॉवर,बालाजी मंदिर,पंचवटी हनुमान मंदिर,मुथा चौक वजिराबाद,एस. पी. ऑफिस चौक,कालामंदिर अशी शोभा यात्रा काढण्यात आली. सोमेश कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर येथे सांगता करण्यात आली. जवळपास ५० हजार भाविक भक्त या शोभायात्रेत सहभागी झाल्या होते.



माऊलींचा जिवंत देखावा,लेझीम पथक, टाळकरी संच,झाशीच्या राणीचा देखावा,ड्रेस कोडमधील भजनी महिला मंडळ,शौर्य पथक सादर करणारे बाल कलाकार हे शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण राहिले. दिंडीचे नेतृत्व डॉ. रमेश नारलावार यांनी केले. आमदार आनंदराव पाटील बोंढारकर,माजी राज्यमंत्री डी पी सावंत, जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे,भाजपा चे संघटन मंत्री संजय कोडगे, मर्चंट बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, उपाध्यक्ष लक्ष्मणराव संगेवार, सरदार दिलीपसिंघ सोडी.



नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, मेरू शिंपी समाजाचे अध्यक्ष शंकरराव सिंगेवार, गजानन महाराज मंदिर संस्थान अध्यक्ष डॉ. तुकाराम तळणकर,डॉ. संजय मानाठकर, मोहन पाटील, गणेश ठाकूर, डॉ. नरेश रायेवार, अनिल पापंटवार, मधुकर मोतेवार, गजानन पिंपरखेडे (वकील), सौ प्रफुल्ला बोकारे, सौ जयश्री देवसरकर,सौ. प्राची चौधरी, सौ अश्विनी देशमुख, लक्ष्मी पुद्रोड पुरणशेट्टीवार,,सौ. माला शर्मा, डॉ विद्या पाटील,ज्योती पाटील, मीनाक्षी पाटील,धनंजय उमरीकर,सौ. संध्याताई छपरवाल यांनी पालखीचे दर्शन घेतले.

लॉन्स क्लब च्या वतीने महावीर चौक येथील हनुमान मंदिर येथे दोन क्विंटल ची शाबुदाना खिचडी वाटप करण्यात आली. नानक साई फाऊंडेशन, इनर व्हील, राजस्थानी महिला मंडळ तर्फे वजिराबाद मुथा चौकात पालखीचे जोरदार स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली.


