लोहा| लोहा-कंधार हा मतदार संघ नेहमीच आमच्या मा सुख-दुःखात पाठीशी उभा राहिला आहे. या मतदारसंघात पाच वर्षापूर्वी आपल्या सगळ्या कडून जी चूक झाली ती आता होणार नाही. सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवावेत. विकास निधी कमी पडणार नाही .या पाच वर्षात मतदार संघ मागे आला. अनेक पक्ष ज्यांनी बदलले तेच आता टॉस करूत असे बोलत आहेत. काहीजणांचे चार वर्षीत दुकान येथे थाटले अशांच्या भूलथापांना बळी पडू नका. एकजुटी अशीच असली पाहिजे हेच सरकार पुन्हा येणार आहे लोहा विधानसभा जिंकू असा विश्वास व्यक्त करत विधानसभा लढविण्याचे संकेत माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले
लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण, दीड कोटी रुपयांचे बुध्द्धविहार यासह बारा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडला. छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात माजी खासदार चिखलीकर बोलत होते. व्यासपीठावर भाजपा नेते माणिकराव मुकदममाजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, प्रविण पाटील चिखलीकर प्रणिताताई देवरे – चिखलीकर तहसीलदार विठ्ठल परळीकर, सां.बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहन पवार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकद्म छत्रपती धुनमल, माजी सभापती खुशाल पाटील पांगरीकर, भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, शोभाताई बगडे, मारोतराव पाटील, बाबाराव पाटील गवते, नरेंद्र गायकवाड उध्दव पाटील, सुभाष गायकवाड, चितळीकर, हरिभाऊ चव्हाण, बालाजी खिल्लारे। शंकरराव नाईक, नरेंद्र गायकवाड, दीपक कानवटे सचिन मुकदम, सूर्यकांत पार्डीकर, बंडू वडजे, प्रवीण धुतमल आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी खा.प्रतापराव पाटील यांची देही बोलीत आत्मविश्वास जाणवत होता लोहा- कंधार विधानसभा लढविणार असे पहिल्यांदाच जाहीर संकेत केले. आ. शिंदे व आशाताई शिंदे या मेहुणे -बहीण त्यावर टीका करत पाचवर्षात कसेकसे पक्ष बदलले याचे खुमासदार शैलीत वर्णन केले ( हसा) दोघे उमेदवारी साठी कसे वेगवेगळ्या दारात उभे आहेत हे सांगताना टॉस करू नका. त्याऐवजी एकाने थोरल्या पवारा कडून तर दुसन्याने धाकट्या पवाराकडून निवडणूक लढवावी असा सल्ला दिला. (हशा) असा खुमासदार शैलीत काही किस्से त्यांनी सांगितले.
सरकार सर्वाच्या हिताचे निर्णय घेत आहे
शेतक-याचे वीज बील माफ केले लाडक्या बहिणीना दरमहा पैसे देत आहे हेच सरकार पुम्हा येईल असा विश्वास व्यक्त केला व माजी खा. प्रतापराव पाटील यांनी विधानसभा लटविण्याचे संकेत दिले . प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी भावनास्पर्शी पण प्रभावी भाषण केले. मामा-आत्याचा पहिल्यांदाच जाहीरपणे शाब्दिक समाचार घेतला. प्रतापराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे व विधनसभा जिकण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार यांनीन केले. यावेळी शोभाताई बगडे, हरिभाऊ चव्हाण यांची समुचित भाषणे झाली. आरंभ छत्रपती शिवरायांच्या शुभोभिकरणाच्या कामाचे शुभारंभ केला. बुद्ध विहाराचे भूमिपूजन तसेच सिनेट रस्त्याचे लोकार्पण पार पडले. संचलन व आभार माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार यांनी केले तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय ,कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
वागदरवाडी वासीयांच्या उपोषण मागे घ्यावे
शहरातील बायपास टू बायपास रस्त्यातील विद्युत पोल हटविण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल तसेच वागदरवाडी गावाला रस्त्या होण्यासाठी साडे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याच्याशी बोलणे झाले आहे. येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल तेव्हा ग्रामस्थांनी उपोषण सोडवावे असे आवाहन माजी खा प्रतापराव पाटील यांनी केले आहे.
लोह्यात दीड कोटी रुपयांच्या बुद्ध विहाराचे प्रतापराव पाटील याच्या हस्ते भूमिपूजन
सिडको चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा तसेच गोदाकाठी बुद्ध मूर्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आपण मला नेहमीच साथ दिली यापुढेही अशीच साथ मिळेल असा विश्वास माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला. लोह्यातील दीड कोटी रुपयांच्या बुद्ध विहाराचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
जुना लोहा येथील त्रिरत्न बुद्ध विहाराचे भूमिपूजन जिल्ह्याचे नेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, प्रवीण पाटील चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, प्राणिताताई देवरे चिखलीकर, आनंदराव पाटील, किरण वट्टमवार, केशवराव मुकदम , दता वाले, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी एम वाघमारे, नरेंद्र गायकवाड , चंद्रमुनी मस्के, आयोजक छत्रपती धुतमल, नारायण येलरवाड,प्रल्हाद फाजगे, हरिभाऊ चव्हाण,आंबूबाई महाबळे, मंगल धुतमल, विमलबाई महाबळे, बापूसाहेब कापुरे, प्रवीण धुतमल ,इमाम लदाफ यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार प्रतापराव पाटील यांनी नांदेड येथे गोदावरी नदीकाठी बुद्ध मूर्ती ,सिडको फाटा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी जागा देण्यासाठी प्रयत्न केला.असे सांगून गेल्या ३०-४०वर्षात बुद्ध विहारासाठी एवढा निधी कोणीही दिला नाही. दीड कोटी रुपयांचे बुद्ध विहार जिल्ह्यात भव्यदिव्य होइल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.निवडणुकीत तुमची साथ पाहिजे असा विश्वास व्यक्त करत बुद्ध विहारासाठी निधी कमी पडणार नाही असे प्रतापरावांनी सांगितले .प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी केले. आयोजक छत्रपती धुतमल यांनी प्रतापराव पाटील व मान्यवरांचा सत्कार केला .संचलन व आभार रत्नाकर महाबळे यांनी केले.