Prataprao Patil Chikhlikar : लोहा विधानसभा लढविण्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर याचे संकेत -NNL
लोहा| लोहा-कंधार हा मतदार संघ नेहमीच आमच्या मा सुख-दुःखात पाठीशी उभा राहिला आहे. या मतदारसंघात पाच वर्षापूर्वी आपल्या सगळ्या कडून जी चूक झाली ती आता होणार नाही. सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवावेत. विकास निधी कमी पडणार नाही .या पाच वर्षात मतदार संघ मागे आला. अनेक पक्ष ज्यांनी बदलले तेच आता टॉस करूत असे बोलत आहेत. काहीजणांचे चार वर्षीत दुकान येथे थाटले अशांच्या भूलथापांना बळी पडू नका. एकजुटी अशीच असली पाहिजे हेच सरकार पुन्हा येणार आहे लोहा विधानसभा जिंकू असा विश्वास व्यक्त करत विधानसभा लढविण्याचे संकेत माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले
लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण, दीड कोटी रुपयांचे बुध्द्धविहार यासह बारा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडला. छत्रपती शिवरायांच्या...
