नांदेडस्पोर्ट्स

Prasad Lokhande of Nanded planted the flag of Maharashtra | नांदेडच्या प्रसाद लोखंडे यांने महाराष्ट्राचा झेंडा रोवला -NNL

नांदेड| आयआयटी दिल्ली तर्फे आयोजित DD ROBOCON 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे महाराष्ट्र राज्य येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत भारत देशातुन दुसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

दिनांक 13 व 14 जुलै 2024 रोजी त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनात भारत देशातून विविध राज्यातून 46 कॉलेजनी सहभाग घेतला होता. सदर प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरींग पुणे या महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करुन भारत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

Press Note Prasad Lokhande of Nanded planted the flag of Maharashtra | नांदेडच्या प्रसाद लोखंडे यांने महाराष्ट्राचा झेंडा रोवला -NNL

ही महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असून सदर महाविद्यालयाच्या टिममध्ये श्रीमती सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे – दस्तूरकर यांचा सुपुत्र प्रसाद लक्ष्मीकांत लोखंडे याने स्वतः तयार केलेल्या कीपॅड कोड – कम्प्युटर प्रोग्राम वर कमांड ठेवत प्रेझेंटेशन मध्ये यशस्वी कामगिरी बजावली ही नांदेडसाठी भूषणावह बाब आहे.

गुरुजन वर्गाचे योग्य मार्गदर्शन तसेच माझ्या टिममधील सर्व सहकारी मित्रांचे अथक परिश्रम यामुळे आम्ही यश संपादित करु शकलो असल्याचे सांगून भविष्यात आमच्या सर्व टिमचे भारत देशासाठी या माध्यमातून भरपूर योगदान देण्याचा मानस असल्याचे प्रतिनिधीशी झालेल्या संवादात प्रसाद सुषमा-लक्ष्मीकांत लोखंडे यांनी विचार व्यक्त केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!