नवीन नांदेड l रक्षाबंधनाच्या पवित्र पावन महिन्यात ब्रह्मकुमारीस सेवा केंद्र सिडको नवीन नांदेड च्या वतीने एका विशेष कार्यक्रमात नवीन नांदेड परिसरातील विविध दैनिकाचे प्रतिनिधी यांच्या बहनजी बि.के.शिवकन्या राखी बांधून सत्कार केला. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख दिनकर भाई तर प्रमुख पाहुण्या बी.के.शिवकन्या बहनजी मुख्य प्रमुख कैलास नगर नांदेड ह्या होत्या.


बारा ज्योतिर्लिंगाला विशेष रोषण करण्यात आली होती .त्यामुळे दर्शनाचा लाभ सर्वांनी घेतला,सिडको हडको परिसरातील वेगवेगळ्या दैनिकाचे प्रतिनिधीना तिलक, रक्षा सूत्र ,राखी, ईश्वरीय प्रसाद ,शाल पुष्पगुच्छ ,मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यात दैनिक गोदातीर समाचारचे प्रतिनिधी रमेश ठाकूर ,दैनिक लोकमतचे शिवाजी राजुरकर ,दैनिक पुण्यनगरीचे तुकारामजी सावंत, दैनिक सकाळचे श्याम जाधव, दैनिक एकमतचे निळकंठ वरळे, दैनिक नवराष्ट्रचे अनिल धमणे, तरुण भारतचे संभाजी सोनकांबळे, एक वृत्त लाईव्हचे दि.गा.पाटील, जी एम 24 लाईव्ह चे संचालक संजय कुमार गायकवाड आदी उपस्थित होते.



भाऊ-बहिनीच्या पवित्र नात्यासोबत समाजात प्रेम ,विश्वास, शांती, पवित्रता, एकता चा संदेश शिवकन्या बहणीजी आपल्या विचारातून विचार व्यक्त केले. नक्कावार माता यांनी राखी पौर्णिमेचे व केंद्राच्या कार्याबद्दलचे माहिती दिली याप्रसंगी दि.गा. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बीके दिनकर भाई यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की सकाळी उठल्यानंतर वर्तमान पेपर वाचताना नकारात्मक बातम्यांचा परिणाम माणसाच्या जीवनावर दिवसभर राहतो .


तेव्हा सकारात्मक विचार असलेले विचार,मजकूर जास्तीत जास्त आपल्या दैनिकातून प्रकाशित करावेत असे विचार व्यक्त केले.आशा उदगिरे माता, निर्मला डोंगरगे माता, देशपांडे माता, उमाकांत उदगिरे भाई कोंडलवार माता , बीके बालाजी भाई यांच्यासह ओम शांतीचे भाई- बहन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यलप्पा कोलेवाड यांनी केले तर आभार डी.पी. कोळनूरे यांनी मांडले.



