देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आल्याने याचा फटका रुग्णाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, वरिष्ठांनी याची दखल घेऊन नवीन इमारत उभारण्याची मागणी होत आहे.


शहापूर येथीलप्राथमिक आरोग्य केंद्राला जवळपास चोवीस पंचवीस खेड्याचा सपर्क असून, महिन्याला एकवेळेस कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात येते, दररोज रूग्ण उपचार करून घेण्यासाठी रूग्णालयात दाखल होतात. सध्या पावसाळ्यात साथीचे आजार होण्याची शक्यता असून, रुग्णांना रुग्णालयात उपचार करतांना जीवघेणा परिस्थितीत उपचार करून घ्यावा लागतो आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला भेगा पडलेले असताना शस्त्रक्रिया केलेल्या महिलानी जीव मुठीत घेऊन पाच दिवस कठीण परिस्थितीत काढावे लागतात. प्राथमिक आरोग्य केंद्र केव्हा जमीन दोस्त होईल याचा नेम नसून,त्यामुळे संभाव्य घटना होण्याअगोदर वरिष्ठांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर नवीन इमारत उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या भागातील जनतेतुन केली जात आहे.





