नवी दिल्ली| देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची 2026 साठी घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार, उद्योग व समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील 131 मान्यवरांना यंदा हा सन्मान जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा समावेश आहे. महाराष्ट्राला यंदा एक पद्म विभूषण, तीन पद्म भूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.


केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या यादीत 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये 19 महिला, 6 परदेशी अथवा अनिवासी भारतीय, तसेच 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या दीर्घकालीन व प्रभावी योगदानाबद्दल मरणोत्तर ‘पद्म विभूषण’ जाहीर झाले आहे.


महाराष्ट्रातील पद्म भूषण मानकरी – अलका याज्ञिक – कला (पार्श्वगायन), पीयूष पांडे – जाहिरात क्षेत्र (मरणोत्तर), उदय कोटक – व्यापार व उद्योग (बँकिंग) पद्म भूषण श्रेणीत महाराष्ट्रातील तीन मान्यवरांची निवड झाली आहे.


पद्मश्री : महाराष्ट्रातील 11 मान्यवर
क्रीडा : क्रिकेटपटू रोहित शर्मा, वैद्यकीय सेवा : श्रीमती आर्मिडा फर्नांडिस, समाजसेवा : जनार्दन बापूराव बोथे, कृषी : श्रीरंग देवाबा लाड, पद्मश्री पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील 11 मान्यवरांची नावे जाहीर झाली आहेत.

कला क्षेत्र : भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, रघुवीर तुकाराम खेडकर, सतीश शाह (मरणोत्तर), व्यापार व उद्योग : अशोक खाडे, सत्यनारायण नुवाल, विज्ञान व अभियांत्रिकी : जुझेर वासी हे सर्व पुरस्कार मार्च-एप्रिल 2026 दरम्यान राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

