नवीन नांदेड l तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संधी मिळाव्यात, त्यांचे कौशल्य समृद्ध होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञा २०२५ या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव दिनांक २१,२२, व २३ फेब्रुवारी २५ रोजी संस्थेत आयोजित केला जात आहे.


“प्रज्ञा २०२५“ या महोत्सवात विद्यार्थ्यांना आणि तंत्रज्ञानप्रेमींना एक चांगले व्यासपीठ मिळणार आहे, जिथे ते त्यांच्या कौशल्य व तांत्रिक क्षमता प्रदर्शित करू शकतात. प्रमुख आकर्षण म्हणून, यंदा विविध स्पर्धा, कनिष्ठ शास्त्रज्ञ Junior Scientist
,भव्य पुस्तक प्रदर्शन, कार्यशाळा, सेमिनार्स, प्रकल्प स्पर्धा, कोडिंग चॅलेंजेस, तंत्रज्ञानविषयक चर्चासत्रे, रोबोट्सविषयक विविध कठीण स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.



“आर-मेगाडॉन २०२५” स्पर्धेमध्ये रोबोटिक वॉर, हॅकाथॉन, ट्रेझर हंट यांसारख्या थरारक आणि आव्हानात्मक स्पर्धांचा समावेश असेल, या महोत्सवात अनेक रोमांचक आणि आव्हानात्मक तांत्रिक स्पर्धा होणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक पथावर चेकपॉइंट्स पार करत विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यशस्वी होण्यासाठी तांत्रिक कौशल्य, रणनीतिक योजना आणि अचूक नियंत्रण आवश्यक आहे. ड्रोन पायलटिंग स्पर्धेत ड्रोनला विविध अडथळ्यांमधून मार्ग काढावा लागतो, ज्यामध्ये अचूकतेचा आणि जलदतेच्या परीक्षेचा सामना केला जातो.


हॅक फ्यूजन” २०२५ ही एक उत्तेजक कोडिंग स्पर्धा आहे, जिथे ३६ तासांच्या कोडिंग मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन वास्तविक समस्यांवर भव्य उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकत्र येऊन कोडर्स आणि नाविन्यपूर्ण विचार करणारे तंत्रज्ञ त्यांच्यातील कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एकत्र येणार आहेत.
या व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन संकल्पना व शिकण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. तसेच, उद्योगतज्ज्ञ, संशोधक, आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यां सोबत संवाद साधणार आहेत.

या तांत्रिक महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.सुनीलजी रायठठ्ठा यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.कैलास देसाई (व्यवस्थापकीय संचालक, Endress+Hauser, India), मा.दिनेश गुप्ता (महाराष्ट्रातील प्रसिद्ध शैक्षणिक YouTuber), नियामक मंडळाचे सदस्य संत बाबा सुखविंदर सिंघजी,संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे उपस्थिती असणार आहेत.
विधार्थी कल्याण विभागचे अधिष्ठाता प्रा. संजय देठे, तसेच संस्थेतील अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक,कर्मचारी व तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहेत .
“प्रज्ञा”, “आर-मॅगाडॉन” व “हॅक-फ्यूजन” हे महोत्सव केवळ स्पर्धांपुरते मर्यादित नाही, तर हे विद्यार्थ्यांना तांत्रिक जिज्ञासा वाढवण्यासाठी, नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी आणि त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी एक प्रेरणादायी मंच ठरणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी भाग घेण्याचे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे व अधिष्ठाता प्रा. संजय देठे यांनी केले आहे.


