Technical Festival ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक महोत्सवाचे आयोजन
नवीन नांदेड l तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संधी मिळाव्यात, त्यांचे कौशल्य समृद्ध होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञा २०२५ या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव दिनांक २१,२२, व २३ फेब्रुवारी २५ रोजी संस्थेत आयोजित केला जात आहे.
“प्रज्ञा २०२५“ या महोत्सवात विद्यार्थ्यांना आणि तंत्रज्ञानप्रेमींना एक चांगले व्यासपीठ मिळणार आहे, जिथे ते त्यांच्या कौशल्य व तांत्रिक क्षमता प्रदर्शित करू शकतात. प्रमुख आकर्षण म्हणून, यंदा विविध स्पर्धा, कनिष्ठ शास्त्रज्ञ Junior Scientist
,भव्य पुस्तक प्रदर्शन, कार्यशाळा, सेमिनार्स, प्रकल्प स्पर्धा, कोडिंग चॅलेंजेस, तंत्रज्ञानविषयक चर्चासत्रे, रोबोट्सविषयक विविध कठीण स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
...
