करियरनांदेड

Impressive Success – हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लीश स्कुलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

हिमायतनगर। शैक्षणीक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या हिमायतनगर शहरातील गुरु‌कुल इंग्लिश स्कुलने दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

या वर्षी शाळेतून आदेश ढोले, प्रथमेश दिगंबर ढोण, कु साक्षी गोपेवाड, शिव बालाजी चव्हाण, कु ज्योति राजू खांडेकर, शेख आयान सेख इलीयास है विद्यार्थी यशस्वी गुणांच्या टक्केवारीनस उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या यशामुळे शाळेचे नांव उज्वल झाले आहे.

हयापैकी आदेश ढोले हा विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला असून, या यशाबद्दल संस्थेचे सचिव व कार्यवाह डॉ. मनोहर ए. राहोड म्हणाले की, आमच्या शाळेतील विद्याथ्याचे यश त्यांनी घेतलील कठोर मेहनत, चिकाटी आणि शिस्तीचे मुर्तीमंत उदाहरण असून, इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आदर्श समाजासमोर ठेवले आहे.

भविष्यात आम्ही अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे सचिव डॉ. मनोहर राठोड, सोहम राठोड, मुख्याध्यापक विजय जाधव, आडेलू भाटे, पंगनवाड सर, गजानन जाधव यर, कृष्णा पवार खर, जेम्ससर, सौ. वनिता मैडम, यांच्या सह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button