नांदेड| भारतीय पिछडा शोषित संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्य साधून बी.पी. मंडल जयंती निमित्त ओबीसी भुषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक समाज भूषण व्यक्तींचा सत्कार सोहळा होणार आहे.


या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून इंजि. लक्ष्मणराव लिंगापूरे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप बनसोडे शिक्षणाधिकारी, नांदेड, बालाजी ईबीतदार प्रसिध्द उद्योजक, नांदेड, नामदेवराव आयलवाड ओबीसी नेते नांदेड, संभाजीराव धुळगंडे मा.जि.प. अध्यक्ष, नांदेड, गोविंदराम सुरनर ओबीसी नेते, नांदेड, बीशन यादव ओबीसी नेते, नांदेड, नंदकुमार कोसबतवार ओबीसी नेते, नांदेड, विश्वनाथ कोलमकर ओबीसी नेते, नांदेड यांच्या हस्ते ओबीसी भुषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा.डॉ.आर.डी. शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे.

हॉटेल विसावा नाना-नानी पार्क जवळ नांदेड शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मा. इंजि. चंद्रप्रकाश गंगाधर देगलूरकर याना ओबीसी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर मरणोत्तर ओबीसी भुषण पुरस्काराचे मानकरी म्हणून कै. सुरेंद्रकुमार जैस्वाल ओबीसी नेते, नांदेड, कै. भानुदास परशुराम यादव ओबीसी नेते, नांदेड, कै. के. धों. कोंडेवार ओबीसी नेते, नांदेड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ओबीसी भुषण पुरस्काराचे मानकरी म्हणून रामचंद्र येईलवाड ओबीसी नेते, कंधार, इंजि. संजयकुमार अवस्थी ओबीसी सल्लागार, नांदेड, इंजि. कोंडिबा रामजी घनचेकर ओबीसी सल्लागार, नांदेड, सतिशचंद्र शिंदे ओबीसी सल्लागार, नांदेड, उत्तमराव गोविंदराव वाडीकर ओबीसी नेते, देगलूर, बाबाराव जरगेवार ओबीसी नेते, हिमायतनगर यांचाही यात समावेश आहे.


या कार्यक्रमास एस.जी.माचनवार, लक्ष्मणराव क्षिरसागर, भुमन्ना अक्कमवाड, आर. के. दाभडकर, श्रावण रॅपनवाड, गणेश गुंडेवार, साहेबराव बेळे, प्रकाश राठोड, बालाजी खरडे, प्रा. डॉ. श्रीमंत राऊत, गणपत पाचंगे, गणेश घोरपडे, दत्ता टोकलवाड, शंकर वानेगांवकर, गंगाधर मावले, दिगंबर गिरी, प्रा. गिरीष चौडेकर, डॉ. श्रीराम राठोड, डॉ. पांडूरंग विभुतवार, पी.पी. बंकलवाड, रामेश्वर गोडसे, विनोद सुत्रावे, डॉ. मार्तंड आयनिले, गोविंद फेसाटे, अॅड. प्रदिप राठोड, अॅड. माणिक वाखरडे, शिवराम पांचाळ, प्रल्हाद गिते, व्यंकटराव पार्डीकर, नागनाथराव देशमुख, दिलीप बाळसकर, माणिक रेणके, प्रभाकर फांजेवाड, विजयजी देवडे, प्रा. डॉ. दत्ता कुंचेलवाड, प्रा. डॉ. दिलीप काठोडे, प्रा. मारोती लुटे, प्रा. डॉ. अमोल काळे, प्रा. डॉ. रघुनाथ शेटे, प्रा. डॉ. बालाजी यशवंतकर, रमेश स्वामी, इंजि. अब्दुल खदीर, प्रा. लक्ष्मण कोंडावार, अशोक कुंटूरकर, रामकृष्ण डोईजड, नागभुषण दुर्गम, दत्ता चापलकर, डॉ. राजेश चव्हाण, डॉ. माधव श्रीमंगले, महेंद्र देमगुंडे, गोविंद दळवी, नारायण पारेकर, हनमंत दाताळकर, इंजि. शंकर सोनवणे, संजय पेटकर, प्रा. ललिता कुंभार, अरूणा पुरी, चंद्रकला चापलकर, पद्मा झंपलवाड, दैवशाला पांचाळ, शेशीकला राठोड, संगिता राऊत, राजश्री माचनवार वर्षा रासे, सुनिता राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती ओबीसी कर्मचारी समन्वय समिती व ओबीसी समन्वय समिती जिल्हा, नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


