नांदेड| परभणी पोलीसांच्या ताब्यातून 15 वर्षापूर्वी पलायन केलेला कुख्यात गुन्हेगार पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी ऊर्फ राहुल बादल बंजारा, वय ५० वर्ष, रा. तलाब कट्टा परळी जिल्हा विड, ह. मु. इंदरा कॉलनी भदारली, ता. राणी जिल्हा पाली, राज्य राजस्थान यास स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत मागील गुन्हयातील आरोपीतांची माहिती काढून कायदेशीर कार्यवाही करण्याचे उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा नांदेड यांनी सहा. पोलीस निरीक्षक आर. व्ही. बाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.


त्यावरून दिनांक २७.०३.२०२५ रोजी सहा. पोलीस निरीक्षक आर. व्ही. वाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांना परभणी येथुन 15 वर्षापुर्वी फरार झालेला आरोपी पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी ऊर्फ राहुल बादल बंजारा हा वजीराबाद परिसरात आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून आरोपीचा गुरुव्दारा गेट नं ०६ शहिदपुरा, नांदेड येथे शोध घेतला असता पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी ऊर्फ राहुल बादल बंजारा वय ५० वर्ष, रा.तलाब कट्टा परळी जिल्हा बिड ह.मु. इंदरा कॉलनी भदारली ता. राणी जिल्हा पाली राज्य राजस्थान हा मिळुन आला.

सदर कुख्यात आरोपी पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी ऊर्फ राहुल बादल बंजारा याचेवर वेगवेगळ्या राज्यात माली गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी यास दिनांक १५.०४.२०१० रोजी बिड जिल्हा कारागृह येथुन परभणी जिल्हा कारागृह येथे वर्ग करण्यासाठी घेवुन जात असताना तो जिल्हा बिड पोलीसांच्या ताब्यातून पळून गेला होता. या प्रकरणी पो.स्टे. कोतवाली जिल्हा परभणी येथे गु.र.नं. ७३/२०१० कलम २२३,२२४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, तरी सुमारे १५ वर्षापासुन फरार असलेला कुख्यात आरोपी पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी ऊर्फ राहुल बादल बंजारा यास सहा. पोलीस निरीक्षक आर. व्ही. वाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी पकडुन पोलीस स्टेशन कोतवाली जिल्हा परभणी यांचे ताब्यात दिले.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, आर. व्ही. वाहुळे, सहा. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड विशेष पथक, स्था.गु.शा. नांदेड विशेष पथकातील, पोउपनि दासरे, पोउपनि चावला, सपोउपनि करले, पोकों देविदास चव्हाण, पोकों मोतीराम पवार, पोकों विठ्ठल वैद्य, स्था.गु.शा. नांदेड येथील पोहेकों मिलींद नरबाग, पोकों राजू डोंगरे चालक पोकों बिचकेवार, यांनी केली आहे. यशस्वी कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.