नांदेड। नांदेड परीक्षेत्राचे नूतन पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून तत्कालीन पोलीस अधिकारी शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमाप यांच्या बदलीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच स्वागत केले जात असून, नांदेड पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


नांदेड विशेष परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर यांची बदली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात झाल्यानंतर नांदेडची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमाप यांनी यापूर्वी नांदेडमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि सामाजिक दृष्टिकोन ठेऊन वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणारे अधिकारी म्हणून ओळख आहे.


आगामी काळात विधानसभा निवडणूक व सण उत्सवाचे वातावरण रहाणार असल्याने तत्पूर्वी प्रमुख अधिकारी यांची बदली व नूतन अधिकारी नियुक्ती करण्यात आल्याने जिल्ह्यातील निवडणुका निर्विघण पार पडण्यास मदत होईल असे अनेकांना वाटते आहे.
