नांदेड l राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महिला आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. माधुरीताई यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल आमदार चिखलीकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवीण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, खा. सुनिल तटकरे – प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,सौ.रुपालीताई चाकनकर प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी व जिल्हा समन्वयक आ. विक्रमजी काळे यांच्या मान्यतेने निवड करण्यात आली आहे. तसेच नांदेड येथील 10 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये सौ. माधुरीताई हंबर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, दिलीपरावजी धर्माधिकारी जिल्हाध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सौ. सुनंदाताई जोगदंड-नांदेड दक्षिण महिला जिल्हाध्यक्षा यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सौ.माधुरीताई हंबर्डे यांच्या निवडीबद्दल नांदेड दक्षिण येथील महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व कौटूंबिक स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.