नांदेड| नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मूल्यमापन आणि मान्यता परिषदेच्या (NAAC) मूल्यांकनामध्ये 3.05 चा प्रभावी सीजीपीए स्कोर मिळवून महाविद्यालयाने A ग्रेड प्राप्त केलेला आहे. दिनांक 28 व 29 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयास नॅक पिर टीमने दोन दिवसीय भेट दिली होती. यावेळी महाविद्यालयातील शैक्षणिक व मूलभूत सेवा सुविधांचे आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन केले होते.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, सौ. अमिताताई चव्हाण, उपाध्यक्षा, शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, डी.पी. सावंत साहेब, सचिव, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, मा. डॉ. आर. के. शेंदारकर, सहसचिव, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, श्री. ॲड उदयरावजी निंबाळकर, कोषाध्यक्ष, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी व सर्व कार्यकारणी सदस्य यांनी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून व शैक्षणिक गुणवतेतून महाविद्यालयास A ग्रेड मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विना पाटील यांनी महाविद्यालयास A ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय कार्यकारी मंडळ यांचे आभार मानले व महाविद्यालयाशी संबंधित सर्वांनीच सांघिक कार्य केल्यामुळे हा दर्जा प्राप्त झाला असल्याचे डॉ.विना पाटील यांनी सांगितले.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ प्रतिमा बंडेवार व नॅक समन्वयक डॉ.अमोल करवा तसेच डॉ. व्ही. एस. खाकरे, ग्रंथपाल डॉ. आर.के वाघमारे,डॉ. सी.डी. महाजन, क्रीडा संचालक, डॉ. पी.ई. भोसले, डॉ. एम.जे पाटील, डॉ राजवंतसिंघ कदम्ब तसेच कार्यालयीन अधीक्षक पी.जी. शिंदे, एस. के. लोंढे व महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले याबद्दल त्यांनी आभार मानले.