क्राईमनांदेड

Nanded Zone : नांदेड परिक्षेत्रात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा सपाटा; ८ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड |  पोलीस उपमहानिरीक्षकांच्या आदेशानुसार नांदेड परिक्षेत्रात अवैध जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. लातूर व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये रोख रक्कम, मोबाईल, जुगार साहित्य व इतर वस्तूंसह एकूण ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात २७ जानेवारी २०२६ रोजी अहमदपूर तालुक्यातील सावळा परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई करत १ लाख ५ हजार २०० रुपये रोख व १२ मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

तसेच नांदेड शहरातील इस्लामनगर परिसरात ३० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत २ लाख ३४ हजार १०० रुपये रोख व २७ मोबाईल असा मुद्देमाल जप्त झाला. याशिवाय इतर ठिकाणच्या कारवायांमध्येही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल, जुगार साहित्य, एक गावठी अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

या सर्व कारवायांमध्ये एकूण ३९ मोबाईल, १ गावठी पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे व मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या मोहिमेमुळे नांदेड व लातूर जिल्ह्यातील अवैध जुगार व्यवसायाला मोठा आळा बसला असून, पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button