नांदेडमहाराष्ट्रव्हिडीओ

The villagers stopped the work | नांदेड न्यूज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच ठेकेदाराने सुरु केल्या भेगा बुजविण्याचे काम – NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| भोकर हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्या भेगा संदर्भामध्ये नांदेड न्यूज लाइव्हने ” राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने भेग बुजविण्याचे काम सुरु केलं. मात्र यातही बोगसपणा आणला जात असल्याने आज सोनारी फाटा ते करंजी परिसरातील युवक, नागरिकांनी सदरचे काम रोखले आहे. जोपर्यंत दर्जेदार पद्दाथीने भेग बुजविल्या जात नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.

IMG 20240715 WA0043 The villagers stopped the work | नांदेड न्यूज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच ठेकेदाराने सुरु केल्या भेगा बुजविण्याचे काम - NNL

नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्युचा सापळा बनला असून, इस्लापूर – हिमायतनगर – भोकर दरम्यान सरसम – सोनारी फाटा – याठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी सिमेंट काँक्रेट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या भागांमध्ये दुचाकी वाहनांचे चाक फसून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जमीन खचल्यामुळे या रस्त्याला तडे जाऊन आणि चार ते सहा इंचाच्या भेगा पडल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. सततच्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

संबंधित कामाची देखरेख करणाऱ्या अभियंत्यांचा स्वार्थीपणा आणि ठेकेदाराकडून झालेल्या निकृष्ट कामाचा हा परिणाम असून, यास जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे. पडलेल्या भेगांची व भगदाडाची थातुरमातुर दुरुस्ती न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा याविरोधात आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दत्ताभाऊ शिराणे यांनी नांदेड न्यूज लाइव्हशी बोलताना दिला होता. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आज सोमवारी संबंधित ठेकेदाराने भेगा बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली.

IMG 20240715 185913 The villagers stopped the work | नांदेड न्यूज लाइव्हने वृत्त प्रकाशित करताच ठेकेदाराने सुरु केल्या भेगा बुजविण्याचे काम - NNL

मात्र यातही थातूर माथुरपणा आणल्यामुळे या भागातील सुजाण नागरिक व ग्रामस्थ युवकांनी ठेकेदाराचे काम रोखले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सुरुवातीपासून बोगसपणा आणला जात असल्याचे आजच्या प्रकरणावरून उघड होत आहे. आता देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध असताना देखील ठेकेदार बोगस पद्धतीने भेगा बुजवून आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात असल्याने ठेकेदाराच्या नाकर्तेपणा बाबत सोनारी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करून ठेकेदाराचे काम रोखले आहे.

संबंधित राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या भेगा बुजविण्याचे कामाची देखरेख करणाऱ्या अभियंत्यांचा दुर्लक्षितपणा आणि ठेकेदाराकडून होत असंलेल्या निकृष्ट कामाची पोळ आज खुलली आहे. अश्या प्रकारे बोगस कामे करून निधी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे. आणि रस्त्याला पडलेल्या भेगांची थातुरमातुर दुरुस्ती न करता ब्लॉक कट करून दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा याविरोधात आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दत्ताभाऊ शिराणे यांनी दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!