नांदेडमहाराष्ट्र

Joint Commissioner Hira Shelke : गेल्या वर्षभरात नांदेड धर्मादाय कार्यालयाकडून 8665 प्रकरणाचा निपटारा-सहआयुक्त हिरा शेळके

नांदेड| गेल्या एक वर्षात नांदेड धर्मादाय कार्यालयाने विविध नाविन्यपूर्ण न्यायीक काम करताना 8 हजार 665 प्रकरणांचा नपटारा केल्याची माहिती धर्मादाय सह आयुक्त हिरा का.शेळके यांनी विश्‍वस्तांच्या
कार्यशाळेत दिली.

राज्यातील महायुती शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा संकल्पनेतून नांदेड येथील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्यावतीने शहरातील वसंतनगर येथील प्रगती महिलामंडळाच्या सभागृहात विश्‍वस्तांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या कार्यशाळेच्या अध्यक्षपदावरुन बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन माजी मंत्री डी. पी. सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड धर्मादाय सह आयुक्त श्रीमती हिरा का. शेळके मॅडम होत्या.

या कार्यशाळेत धर्मादाय उप आयुक्त, नांदेड श्रीमती ममता यो.राखडे यांनी धर्मादाय रुग्णालयाशी संबंधित कायदेशीर व रुग्णांना उपयोगी अशी माहीती दिली. सहायक धर्मादाय आयुक्त परभणी श्रीमती पानसरे मॅडम यांनी विश्वस्तांना नेहमी उपयोगी पडणारे न्यासाच्या विविध प्रकारच्या बदल अर्ज / फेरफार अर्जाविषयी अतिशय सुलभ भाषेत माहीती दिली. याचप्रमाणे सदरच्या कार्यशाळेत सनदी लेखापाल रविंद्र भारतीय यांनी न्यासांना करावे लागणारे ऑडीट रिपोर्ट त्यामधील विविध बारकावे त्यांच्या पध्दती यांच्याविषयी उहापोह केला. तर शेवटी नांदेड धर्मादाय कार्यालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड मुकूंद चौधरी यांनी न्यासांनी कर्ज घेणेकरिता घ्यावी लागणारी दक्षता व त्यासंबंधीत कागदपत्रे याविषयीची कायदेशीर बाजूची मांडणी केली. या कार्यशाळेचे सुंदर सुत्रसंचालन सहायक धर्मादाय आयुक्त नांदेड श्रीमती वैशाली वि.चौधरी यांनी केली. कार्यशाळेचे प्रास्ताविक अ‍ॅड. बी. जी. मोरे तर आभारप्रदर्शन अ‍ॅड. विलास भोसले यांनी केली आहे.

धर्मादाय सह आयुक्त,नांदेड श्री हिरा का. शेळके यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात धर्मादाय कार्यालय, नांदेड कडुन मागील एका वर्षात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामे व न्यायीक कामांचा उहापोह केला. मागील एका वर्षात एकुण 8765 प्रकरणांचा निपटारा या कार्यालयाकडुन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यशाळेस उत्स्फुर्तपणे उपस्थीत अनेक विश्वस्तांपैकी काहींनी तेथे उपस्थीत न्यायीक अधिकारी, सनदी लेखापाल आणि ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या प्राश्नीक स्वरुपात सुसंवाद देखील साधला.या विश्वस्तांच्या कार्यशाळेस नांदेड, परभणी व हिंगोली येथील विधिज्ञ आणि शेकडो विश्वस्तांनी उपस्थीती राहुन न्यासाशी संबंधीत कायदेशीर ज्ञानाची मेजवानी लुटली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!