Joint Commissioner Hira Shelke : गेल्या वर्षभरात नांदेड धर्मादाय कार्यालयाकडून 8665 प्रकरणाचा निपटारा-सहआयुक्त हिरा शेळके
नांदेड| गेल्या एक वर्षात नांदेड धर्मादाय कार्यालयाने विविध नाविन्यपूर्ण न्यायीक काम करताना 8 हजार 665 प्रकरणांचा नपटारा केल्याची माहिती धर्मादाय सह आयुक्त हिरा का.शेळके यांनी विश्वस्तांच्या
कार्यशाळेत दिली.
राज्यातील महायुती शासनाने 100 दिवसांचा कृती आराखडा संकल्पनेतून नांदेड येथील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्यावतीने शहरातील वसंतनगर येथील प्रगती महिलामंडळाच्या सभागृहात विश्वस्तांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या कार्यशाळेच्या अध्यक्षपदावरुन बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन माजी मंत्री डी. पी. सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड धर्मादाय सह आयुक्त श्रीमती हिरा का. शेळके मॅडम होत्या.
या कार्यशाळेत धर्मादाय उप आयुक्त, नांदेड श्रीमती ममता यो.राखडे यांनी धर्मादाय रुग्णालयाशी संबंधित कायदेशीर व रुग्णांना उपयोगी अशी माहीती दिली. सहायक...
