नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय व मातृसेवा आरोग्य केंद्र येथे एकच ईमारती मध्ये दोन कार्यालय असल्याने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने व रात्रपाळी साठी कर्मचारी नियुक्ती अभावी एकाच इमारतीत असलेल्या दोन कार्यालय सुरक्षा रामभरोसे झाली असून तात्काळ सुरक्षा रक्षक नेमणूक करणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.
नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय व मातृसेवा आरोग्य केंद्र हे दोन कार्यालय एकाच इमारतीत असल्याने दैनंदिन नागरिक व रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही कार्यालय अंतर्गत संगणक सह व ईतर यंत्र सामुग्री यांच्या सह दस्त ऐवज, संचिका व औषधी साठा मुबलक प्रमाणात आहे,तर अनेक संचिका गत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आहेत.
या ठिकाणी या पुर्वी दोन सुरक्षारक्षक यासह रात्री पाळी कर्मचारी कार्यरत होते मात्र गेल्या अनेक महिन्यांपूर्वी येथील सुरक्षा रक्षक या ठिकाणी काढून टाकल्याने सुरक्षा रामभरोसे झाली आहे.मोठ्या प्रमाणात होणारी वर्दळ, नागरीक येजा यासह मातृसेवा आरोग्य केंद्र येथे लसीकरण व दैनंदिन रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी दैनंदिन चौवीस तासांसाठी सुरक्षा रक्षक नेमणूक करणे अपेक्षित आहे.प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.