मुखेड | मुखेड तालुका मराठी पत्रकार परिषदची २०२४ – २०२५ सालाची कार्यकारणी दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी जेष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. यात मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड, सचिवपदी संतोष बेळगे, कार्याध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, माजी अध्यक्ष शिवाजी कोणापुरे,
पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील पौळकर, माजी अध्यक्ष किशोर संगेवार, ज्येष्ठ पत्रकार सुशील पत्की, ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शिवकांत मठपती, , प्रसिद्ध छायाचित्रकार हाफिजखान पठाण हे सल्लागार पदी असतील व आगामी काळात वेळोवेळी मार्गदर्शन करून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी आवाज उठविण्याचे या बैठकीत ठरले. या निवडीबद्दल सर्वच कार्यकारिणीचे राजकीय , सामाजिक, शैक्षणिक , मित्र परिवारातून व इतर स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागात पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. पत्रकारांच्या मुलांना शिक्षण, पत्रकारांसाठी निवारा, तालुक्यात पत्रकार भवन, पत्रकार व कुटुंबासाठी आरोग्यकवच, पत्रकारांची सुरक्षा, पत्रकार संरक्षण कायदा , ग्रामीण भागातील पत्रकारांना मानधन यासह विविध पत्रकारांच्या समस्यांवर आगामी काळात सर्वांना विश्वासात घेऊन लढा देऊन मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार .
ज्ञानेश्वर डोईजड, अध्यक्ष, मराठी पत्रकार संघ,मुखेड