हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराचे नवे दार उघडत आहे. हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी यांच्या वतीने आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, लातूर यांच्या सौजन्याने मोफत वेल्डिंग कौशल्य प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.


सदर प्रशिक्षण कॅम्प दिनांक २ नोव्हेंबर २०२५ पासून सिरंजनी येथे सुरू होणार असून, या कॅम्पमध्ये ३० युवकांना अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून वेल्डिंग क्षेत्रातील संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ४५ दिवसांचा सघन प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिंद्रा, टाटा, मारुती सुझुकी, टोयोटा यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी स्वयंरोजगारासाठी बँक कर्ज प्रकरणात संपूर्ण मार्गदर्शन, प्रशिक्षण काळात वेल्डिंगसाठी लागणारी सुरक्षा किट मोफत दिली जाणार आहे.


यासाठी शैक्षणिक पात्रता व अटी लावण्यात आल्या असून, किमान शिक्षण: ८वी पास,वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे, प्रशिक्षण कालावधी: ४५ दिवस राहणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रात 1. मार्कशीट 2. आधार कार्ड 3. पॅन कार्ड 4. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी.सी.) 5. बँक पासबुक झेरॉक्स 6. पासपोर्ट साईज फोटो – ६ नग आणणे आवश्यक आहे.


या प्रशिक्षण शिबिराचा लाभ सर्वाना घ्यावा असें आवाहन आयोजक पवन नारायण करेवाड – 📞 8805385353 आणि सर्व पदाधिकारी, हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी यांनी केलं असून, हे शिबीर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, लातूर यांच्या सौजन्याने ठेवण्यात आले आहे, यासाठी 📞 संपर्क क्रमांक :बालाप्रसाद पाचंगे – 8007021527, तुषार निदानकर – 8600677673, कल्याण पाटील – 8698690790 आदिना संपर्क करावे या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका!




