हिमायतनगर| गृहस्थ आश्नमात राहुन संसारीक जीवन सार्थक करायचे असेल तर संस्कार जपणे महत्वाचे आहे. मनुष्याचा मन चंचल असते हे सर्वांनाच चांगल्याप्रकारे प्रकारें माहित आहे. मनाला स्थिर करण्यासाठी मोबाईल नव्हे भगवंताचा नामस्मरण करणे आवश्यक आहे. मोबाईल मुळे सर्वाधिक नुकसान हिंदू समाजाच होत आहे. आजुबाजुला काय चाललंय या बाबींकडे लक्ष ठेवून वागणे स्वतः सह जनहिताचे ठरु शकते असा मौलिक उपदेश परमपूज्य स्वामी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी दिला.


ते पिंपळगाव येथील मठात गुरुपौर्णिमा उत्सव प्रसंगी उपस्थित झालेल्या सद्भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ तिर्थक्षेत्र क्षेत्र पिंपळगाव येथे सकाळी ११ ते १२ या वेळात गुरूपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुढे बोलताना बालयोगी व्यंकटस्वामी महाराज म्हणाले की, मनुष्य जन्माला आल्यानंतर सोने, हिरे, जवाहरात, धन संपती सर्व काही गौण आहे, प्रत्येक मनुष्याला देह सोडून जाताना सर्व काही येथेच सोडून जावे लागते हे देखील सर्वांनाच माहित आहे. किती संपतात कमवायची हे लक्षात ठेऊन चांगले कर्म करायला पुढे यावे.



माझ शिक्षण झालं… गुतेदारी सुरू केली असताना वयाच्या २७ व्या वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्याने गुरुच्या आशिर्वादाने महाराज झालो आहे. नवरा बायको, मुलं मुली संसारात गुरफटत असल तरी सुख समाधान मिळत नाही. हे सुख तर सरड्या सारखे आहे. सरड्याची धाव कुपाट्या पर्यंत असते. खरं सुख भगवंताच्या नामात असुन, जय जय सद्गुरू नामाचा जप आपल्यासाठी मौलीक ठरु शकते. कोणत्याही देवाला कठाळे, गो शाळेत गाय सोडण्या ऐवजी त्यांची जोपासना करा. त्याच पैशाच्या माध्यमातून शिक्षण महत्त्वाचे असुन, आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा वाटा ऊचला असे आवाहन करत मोबाईलच्या वापराकडे दुर्लक्ष करा असे सांगितले.



ठिक १२ वाजता बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या हस्ते श्री दत्तात्रेय मंदिरात महाआरती करण्यात आली. नंतर चिंतावार या जोडप्यासह सौ शैलशा नागोराव देवठाकर यांच्या हस्ते गुरुपुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित भक्तांना सौ शैलेशा देवठाकर यांच्या वतीने महाप्रसाद वितरण करून गूरूपौर्णिमा २०२५ महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दत्त मंदीर आणि परीसर भाविकांनी खचाखच भरला होता. भाविकाच्या अलोट गर्दीला बालयोगी व्यंकटस्वामी महाराज उपदेश करताना अतिशय शांततामय वातावरणात दिसुन आले.

बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या नावावर पिंपळगाव येथे देणगी मागणा-याना देऊ नका
तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील मठासाठी आजपर्यंत कसल्याही प्रकारची पावती बुक छापुन देणगी मागीतली नाही. लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आलेल्या नाग साधु यांनी काही देणगी वसुल केल्याचे ऐकल आहे. कामारी, वाटेगाव सह काही ठिकाणी पिंपळगावच्या नावांवर काही जण देणगी मागायला आल्याचे ऐकल असुन, आपल्या सर्वांच्या सहकार्याने येथे ज्यावेळी देणगी लागेल त्यावेळी आपल्या समोर येऊ. भोदुबाबाना येथील मंदिराच्या व मठाच्या नावांवर देणगी देऊन स्वतःची फसवणूक करुन घेऊ नका असे आवाहन त्यांनी भविकांना केले.


