HomeनांदेडMLA Baburao Kadam elected : हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांची सार्वजनिक...

MLA Baburao Kadam elected : हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांची सार्वजनिक उपक्रम समितीवर निवड

हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालया अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम समितीवर हदगाव, हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १८९ अन्वये समिती मार्फत समितीची रचना, तिची व्याप्ती, कामकाज चालविणे, विविध कामांच्या तपासणीसाठी विषयांची निवड, अभ्यास गटाची नियूक्ती आदी कामे समिती मार्फत पाहीली जातात. विधान सभेने केलेल्या नियमान्वे प्रस्थापित केलेल्या सार्वजनिक उपक्रम समिती वर प्रतिनीधीत्व करण्यासाठी विधान परिषदेकडून पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर आपल्या सदस्यांमधून सभापती पाच सदस्यांची निवड या समितीवर करतात.

त्यामध्ये आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची निवड झाल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक बबन कदम यांनी दिली. या समितीच्या अधिकारात गृह विभाग, गृह परिवहन विभाग, वन विभाग, महसूल विभाग, नगरविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, उद्योग विभाग, उद्योग व खनीकर्म विभाग, उर्जा विभाग,कृषी विभाग,पशू संवर्धन विभाग, दुग्ध विकास,मत्सय व्यवसाय विभाग, सहकार विभाग, पनन विभाग,वसत्रौद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यटन विभाग,आदी विभागातील शासनाच्या विविध धोरणा संबंधीच्या बाबी आणी दैनंदिन प्रशासनाच्या बाबी विषयी बैठकाचे आयोजन करूण त्या समस्यां संबंधित चर्चा करणे या बाबी येत असल्याची माहिती ही बबन कदम यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments