नांदेड| शांती आणि एकात्मतेचा संदेश देत येथे मुतावल्ली कुटुंब आणि मित्रांकडून वसीम बाबू सेठ यांच्या कार्यालयात दावत ए इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यात धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.


जेमचे महामन ई काउसी, पैयाबोधी भन्ते,फादर रेव्ह. राज जॉन्सन याकूब, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक सरदार रनजित सिंघ चिरागीया, मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,प्रशासनाकडून सहाय्यक नगरपालिका आयुक्त गिरीश कदम, पोलिस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक, वजीराबाद चे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, वजीराबाद चे पोलिस निरीक्षक रणजित भिटे, वाहतूक शाखेचे चे पोलिस निरीक्षक साहेबराव गुट्टे, नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे, मजूर फेडरेशन चे चेअरमन लक्ष्मीकांत गोने, हॅपी क्लबचे शोयब भाई,माधवराव पाटील,वसीम बाबू सेठ, सत्य मराठी चे संपादक अयुब पठाण, नांदेड टुडे चे संपादक नईम खान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येकाने प्रत्येक उत्सव एकत्र साजरा केला पाहिजे अशी भावना भन्ते पैयाबोधी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केली.


इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने परस्पर बंधुता वाढते. भारत विविधतेत ऐक्याचे प्रतीक आहे. आपण कोणत्याही विभाजनशील सामर्थ्याच्या जाळ्यात अडकू नये. होळी, गुडी पडवा आणि ईद हे सर्व उत्सव आम्हाला एकत्र राहण्यास शिकवतात. आपण सर्वांनी हे एकत्र साजरे केले पाहिजे कारण ऐक्य ही आपली खरी शक्ती आहे असे प्रतिपादन वसीम बाबू सेठ यांनी केले. राज्य आणि देशाच्या समृद्धी, ऐक्य आणि शांततेसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.
