Message of peace and unity : शांती आणि एकात्मतेचा संदेश : वसीम बाबूसेठ यांच्या कार्यालयात दावत ए इफ्तार पार्टी
नांदेड| शांती आणि एकात्मतेचा संदेश देत येथे मुतावल्ली कुटुंब आणि मित्रांकडून वसीम बाबू सेठ यांच्या कार्यालयात दावत ए इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यात धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
जेमचे महामन ई काउसी, पैयाबोधी भन्ते,फादर रेव्ह. राज जॉन्सन याकूब, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक सरदार रनजित सिंघ चिरागीया, मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,प्रशासनाकडून सहाय्यक नगरपालिका आयुक्त गिरीश कदम, पोलिस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक, वजीराबाद चे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, वजीराबाद चे पोलिस निरीक्षक रणजित भिटे, वाहतूक शाखेचे चे पोलिस निरीक्षक साहेबराव गुट्टे, नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे, मजूर फेडरेशन चे चेअरमन लक्ष्मीकांत गोने, हॅपी क्लबचे शोयब भाई,माधवराव पाटील,वसीम बाबू सेठ, सत्य मराठी चे संपादक अयुब पठ...
