हदगांव, शेख चांदपाशा| हिंगोली लोकसभाचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी सोमवारी बोलविलेल्या हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील कर्मचार्याच्या अधिकाऱ्यांची आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीला अनेक संबधीत कर्मचारी व अधिकारी गैरहजर होते. याबाबत खा.नागेश पा.आष्टीकर हे स्थानिय प्रशासनावर चांगले संतापले. अश्या बैठकीला ‘गौण … ‘समजणा-या गैरहजर कर्मचारी अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई संदर्भात… जिल्हाधिकारी नांदेडकडे बैठक लावून कारवाईची सूचना जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात येईल असं सांगितलं. अशा दांडी बहाद्दर कर्मचारी व अधिकाऱ्यावर प्रशासनद्वारे कोणती कारवाई करण्याचे निर्देश दिले. याबाबत स्थानिय प्रशासन काहीच माहिती देण्यात येत नाही.


या बाबत मुजोर अधिकारी हतबल जनता झाल्याचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. हदगाव तालुक्यात 125 ग्रामपंचायती असून वाडी तांड्यासह गावांची संख्या 178 असल्याची माहीती आहे. तालुक्यात किती हातपंप आहेत, किती चालू आहेत की नाही टँकरद्वारे पाणीपुरवठा कोणत्या गावात होतो, अशी माहिती नव्हती खाजगी विहीर बोर अधिग्रहण याबाबत पाणी टंचाईच्या बैठकीत काहीच माहिती संबधीत कर्मचारी व अधिकाऱ्याकडे नव्हती. हदगाव हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश गावात जलजीवन योजनेसह अनेक योजनांची कामे ठप्प आहेत. अस तेथील स्थानिक गावाच्या संतप्त प्रतिक्रिया ह्या बैठकीला आलेल्या त्रस्त नागरिकांच्या होत्या.


हर घर जल जीवन मिशन योजना ही बहुतांश गावात कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. ग्रामिण भागात सार्वजनिक विहिरीतून गाळ काढण्यात आली की नाही. याची पण कोणत्या अधिका -याकडे माहिती नव्हती अशा महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या कर्मचारी अधिकारी याबाबत कोणत्या कारवाईचे निर्देश विद्यमान… खासदार यांनी प्रशासनाला दिले. या बाबत कोणतीच माहिती मिळत नाही खासदार यांच्या सुचनेवर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे आता ग्रामिण जनतेचे लक्ष लागल लागले आहे.




