MP’s water shortage meeting : विद्यामान खासदाराच्या पाणी टंचाई बैठकीला अनेक कर्मचारी अधिका-यांची दांडी
हदगांव, शेख चांदपाशा| हिंगोली लोकसभाचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी सोमवारी बोलविलेल्या हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील कर्मचार्याच्या अधिकाऱ्यांची आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीला अनेक संबधीत कर्मचारी व अधिकारी गैरहजर होते. याबाबत खा.नागेश पा.आष्टीकर हे स्थानिय प्रशासनावर चांगले संतापले. अश्या बैठकीला 'गौण ... 'समजणा-या गैरहजर कर्मचारी अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई संदर्भात... जिल्हाधिकारी नांदेडकडे बैठक लावून कारवाईची सूचना जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात येईल असं सांगितलं. अशा दांडी बहाद्दर कर्मचारी व अधिकाऱ्यावर प्रशासनद्वारे कोणती कारवाई करण्याचे निर्देश दिले. याबाबत स्थानिय प्रशासन काहीच माहिती देण्यात येत नाही.
या बाबत मुजोर अधिकारी हतबल जनता झाल्याचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. हदगाव तालुक्यात 125 ग्रामपंचायती असून वाडी तांड्यासह गावांची संख्या 178 असल्याची माहीती आहे. तालुक्यात किती ह...
