नांदेड| आषाढी एकादशी संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्वाची आणि मोठी मानली जाते. आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ एकादशी आणि ‘महाएकादशी’ म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात व आषाढी महोत्सवाताला आपल्या संस्कृतीत मोठे स्थान आहे


या वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय मार्गावर मार्गस्थ होत महात्मा फुले प्राथमिक विद्यालय बाबानगर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधत बाळ गोपाळ विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रुखमाई आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून दिंडीचा आनंद लुटला यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री यू. एस.दुगाळे , इन्चार्ज सौ. महाजन मॅडम, पेशवे मॅडम, निर्णे सर, उमाटे सर यांच्यासह शिक्षक,शिक्षिका व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.




