नवीन नांदेड| वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नवीन नांदेड येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले माधव भुजंगराव पुयड यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने इंग्रजी विषयांमध्ये पीएच.डी प्रदान करण्यात आली.


त्यांनी डॉ. जीवन मसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली “न्यु हिस्टोरीसिझम इन द सिलेक्ट नोव्हेल ऑफ नयनतारा सहगल”हा विषय घेऊन आपले संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव, सचिव तथा माजी नगरसेवक ॲड.श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ शेखर घुंगरवार,


उपप्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड,इंग्रजी विषय विभाग प्रमुख डॉ. जी वेणुगोपाल,डॉ.गणेश लिंगमपल्ले, प्रो.डॉ. नागेश कांबळे, डॉ.ओमप्रकाश कांबळे,प्रा. प्रबुद्ध चित्ते, कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, व मित्र मंडळी सह इत्यादीने अभिनंदन केले आहे.
