HomeकृषीMla Chikhalikar ; लोहा -कंधार तालुका कृषी विभागाने प्रशासनात सुधारणा करावी -...

Mla Chikhalikar ; लोहा -कंधार तालुका कृषी विभागाने प्रशासनात सुधारणा करावी – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा। लोहा -कंधार तालुका कृषी विभागाच्या गेल्या पाच वर्षात प्रचंड मरगळ आली आहे. दौऱ्याच्या नावाखाली कार्यालय कोणीच वेळेवर उपस्थित राहत नाहीत. शेतकऱ्यांना शेती बांधावर जाऊन मार्गदर्शन करत नाहीत. त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळून देण्यात परिपूर्णता नाही. माती परीक्षण , पीक उत्पादन वाढीसाठी उपाययोजना केल्या जात नाहीत .बियाणे उगवले नाही किंवा पिकांना फळधारणा झाली नाहीत तर त्या संबधित कंपनीवर कार्यवाही होत नाही आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली जात नाही. खत टंचाई निवारण वेळीच नाही .दोन्ही अधिकारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचे काम असमाधानकारक असून यापुढे त्यात सुधारणा व्हावी अन्यथा कार्यवाहिला सामोरे जावे लागेल ,शेतकऱ्यांची हेळसांड सहन केली जाणार नाही. या भाषेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कृषी विभागाचे खरडपट्टी काढली.

लोहा व कंधार तालुका कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या उपस्थितीत श्रीनिवास हॉल लोहा येथे पार पडली यावेळी माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, जिल्हा अधिकक्ष कृषि अधिकारी दतकुमार कळसाईत,जिल्हा परिषद कृषी अधिकारी अनिल शिरफुलें, कंधार प्रभारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, माणिकराव मुकदम, कंधार बीडीओ महेश पाटील , जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी राठोड, कंधार तालुका कृषी अधिकारी अनिल वाढोरे,

आयोजक लोहा तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपल्लेवार,माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती बाबुराव केंद्रे उमरगेकर, माजी उपनगराध्यक्ष दता वाले , माजी गटनेते करीम शेख, कृषी अधिकारी (प स) वाव्हूळे , वजन व मापे निरीक्षक एस जी धुमाळ कृषी अधिकारी एल एम हांडे,बी डी जाधव ,, हरिभाऊ चव्हाण ,दिनेश तेल्लवार, माजी नगरसेवक भास्कर पाटील, राष्ट्रवादी कोंग्रेसचे शहराध्यक्ष राम पवार, कृषी दुकान संघटनेचे माधव सूर्यवंशी,मस्कीकर यासह पदाधिकारी, , शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या समोर कृषी विभागाचा फोलपणा उघड झाला .कोणतीच माहिती नीट नव्हती.विचारले ते सोडून अधिकारी व संबधीत दुसरेच सांगत होते.मागील पाच वर्षात या दोन्ही तालुक्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड केली कार्यालयात राहत नाहीत अन गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत असे यापुढे चालणार नाही असा सज्जड इशारा आमदार चिखलीकर यांनी या विभागाला दिला तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा गजर करत त्याच्या निर्णयाचे जणू स्वागतच केले.

लोहा व कंधार तालुका कृषी अधिकारी व त्याच्या कर्मचाऱ्याचे काम असमाधानकारक आहे त्यात सुधारणा व्हावी दर सोमवारी सर्व जणांनी कार्यालयात हजर असावे पीक उत्पादन वाढीसाठी ववेळेवर माहिती दिली जात नाही .कर्मचारी दौऱ्याच्या नावाखाली गावात जात नाहीत .शासकीय योजनांचा फायदा लाभार्थ्यांना मिळत नाही असे यापुढे चालणार नाही.पाच वर्षांत जी मरगळ आली ही आता चालणार नाही .शेतकऱ्यांची हेळसांड सहन केली जाणार नाही असा शब्दात त्यांनी कृषी विभागाला फटकारले. दिनेश तेल्लवार याना शेततळे नेटसेट चे मी खासदार होतो आता आमदार झालो तरी मिळाले नाही ही अंत्यत खेदाची बाब होय या शब्दात त्यांनी कृषी विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी विविध योजनांची माहिती दिली. सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी माणिकराव मुकदम यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी सदानंद पोटपल्लेवार, कंधार चे भारत वाढोरे यांनी आढावा सादर केला आरंभी आ चिखलीकर व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा प्रतापराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments