नांदेड | लिबगाव पोलीसांनी अवैध जुगार अड्यावर छापा मारुन अंदर बाहेत नावाचा जुगार खेळणाऱ्या 11 इसमांवर कार्यवाही केली असून, त्यांच्याकडून नगदी रक्कम, मोटार सायकल, जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लक्ष 89 हजार 600/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर व्रत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार लिंबगाव ठाण्याचे सपोनि पंढरीनाथ बोधनकर, पोस्टे लिंबगाव यांनी दिनांक 09.07.2025 रोजी दुपारी 16.05 वा. चे सुमारास पडीत गोडाऊन लिंबगाव माँडा येथे काहीजण अंदर बाहेर नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे समजल्याने लिंबगाव पोलीसांनी छापा मारला असता तिथे अक्षय मनोहर कदम, सिध्दार्थ गंगाधर वगर, युवराज प्रकाश दुदमल, कपिल भगवान आटवले, गजानन तुळशीराम पोहरे, राहुल कुंडलिक नरवाडे, गंगाधर भगवान भंडारी, भगवान ग्यानोजी वगर, सोनू राजेंद्र वगर, नितेश जयकुमार कदम, रोहन राजू कदम या अकरा जनाकडून नगदी 10,000/-रु, मोटार सायकल, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण 2 लक्ष 89,600/-रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष जप्त करुन त्यांच्यावर पोलीस स्टेशन लिंबगाव येथे आणुन कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.

हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड (IPS), सरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर, डॅनियल वेन, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पंढरीनाथ वोधनकर, सहा पोलीस निरीक्षक, श्री मुसा सय्यद, पोउपनि पोस्टे लिबगाव पोहेकॉ दासरवाड, तिडके, सातारे, रामन चैनवाड, पोना खंडागळे, चालक पोकों पाठक सर्व ने पोस्टे लिंबगाव यांनी केली आहे. पोलीस स्टेशन लिंबगाव येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी अवैध धंद्यावर कारवाई करुन उत्कृष्ट कामगीरी केल्याने अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी लिबगाव पोलीस पथकाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.



