नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंती निमित्त ‘स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वी या व्याख्यानमालेत पद्मश्री डॉ. गणेश देवी व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी या व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प गुंफण्यासाठी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व संपादक श्री. मधुकर भावे यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या विद्वत व्याख्यानाचे आयोजन दि. ०५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५:३० वा. नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये करण्यात आलेले होते. ते आता काही कारणास्तव ५ ऑक्टोबर एैवजी पुढे ढकलण्यात आला आहे. असे संयोजन समितीने कळविले आहे.
यानिमित्ताने ‘महाराष्ट्र:काल, आज आणि उद्या’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित राहणार आहेत. तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव तथा संयोजन समितीचे डॉ. शशिकांत ढवळे, पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, पीपल्स महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. ए. एन. सिद्धेवाड, डॉ. एस पी. पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.