Madhukar Bhave : श्री मधुकर भावे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला -NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंती निमित्त ‘स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वी या व्याख्यानमालेत पद्मश्री डॉ. गणेश देवी व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी या व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प गुंफण्यासाठी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व संपादक श्री. मधुकर भावे यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या विद्वत व्याख्यानाचे आयोजन दि. ०५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५:३० वा. नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये करण्यात आलेले होते. ते आता काही कारणास्तव ५ ऑक्टोबर एैवजी पुढे ढकलण्यात आला आहे. असे संयोजन समितीने कळविले आहे.
यानिमित्ताने ‘महाराष्ट्र:काल, आज आणि उद्या’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे आपले विचार...
