उस्माननगर| येथील केंद्रांतर्गत येणाऱ्या लाठ खु. ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एन .एम .एम. एस . परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या नॅशनल मेरिट कम मिन्स स्कॉलरशिप ( एन एम एम एस) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील येता आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे तसेच त्याला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत ही शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे.

उस्माननगर संकुल अंतर्गत येणाऱ्या लाट खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . यामध्ये कु. पायल किशनराव इंगोले , व श्रीनिवास हरी बाबळे या दोन विद्यार्थ्यांनी एन एम.एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण यश प्राप्त केले आहे. एन एम एम एस परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेतील शिक्षक यांनी केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गादेकर व सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी , शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , गावातील नागरिक यांनी अभिनंदन केले आहे.
