नांदेड। देशाच्या विविध राज्यात स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जलजीवन मिशन या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षक म्हणून गावो-गावी महाराष्ट्र, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल,गुजरात, मध्यप्रदेश,जम्मू कश्मीर,झारखण्ड,उत्तराखंड, राजस्थान इ.विविध राज्यात जनजागृति करण्याचे उल्लेखनीय काम केले आहे.
त्याबरोबरच 2015-16 साली दरम्यान लाल बहादुर शास्त्री प्रशासनिक अकादमी,मसूरी उत्तराखंड येथे आईएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी यांना त्यांनी स्वच्छ भारत मिशन समुदाय संचलित संपूर्ण स्वछता विषयी (CLTS) अंतर्गत त्यांनी प्रशिक्षण दिले होते.त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात किशोरकुमार वागदरीकर यांचा सन्मान केला.