हदगाव l राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हदगाव शहरातील आंबेडकर चौक येथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बाळा देशमुख आमगव्हाणकर व सतीश शिंदे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस बाळा देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर सतीश शिंदे यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन्ही युवा नेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जयंतीनिमित्त खिचडी वाटपाचा उपक्रम राबवला. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी खिचडीचा लाभ घेतला. यावेळी सरपंच सिताराम पाटील कदम, बाळा देशमुख, सतीश शिंदे, सुनील तंत्रे, राहुल बिरदाळ, ऋतिक तालंकर, नकुल देशमुख, हरीश काळे, संकेत काळे, शिवराज तावडे, अतुल कदम, अनिल माळुंदे आदी उपस्थित होते.



