क्राईमनांदेड

Yunus Bhai’s murder accused arrested : खडकपुरा मदीना हॉटेलचे मालक युनूस भाईच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद -NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार चाप बसविण्यावर पोलिसांना यश आले असताना आता नांदेड शहरात खुनाची मालिका सुरू झाली आहे, तब्बल15 दिवसात 4 खून झाले असून, पोलिसांना दिवसा ढवळ्या होणाऱ्या खुनाच्या घटनेतील मारेकरी शोधून काढले असले तरीयामुळे मात्र कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्रीमती, किरितिका सी.एम. सहायक पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना दिनांक 01/09/2024 रोजी पोलीस ठाणे वजिराबाद गुरंन 440/2024 कलम 103 (1) भा. न्या. संहीता दाखल खुनातील गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.

IMG 20240907 WA0071 Yunus Bhai's murder accused arrested : खडकपुरा मदीना हॉटेलचे मालक युनूस भाईच्या खुनातील आरोपीस केले जेरबंद -NNL

सदर सुचनां प्रमाणे परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे आर.डी वटाने, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकॉ / दत्तराम जाधव, पोहेकॉ//विजयकुमार नंदे, पोहेकॉ मनोज परदेशी, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकों/ बालाजी कदम, पोकॉ/ रमेश सुर्यवंशी, पोकों/ इम्रान शेख, पोकॉ/ भाऊसाहेव राठोड, पोकों / अंकुश पवार व सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ राजेंद्र सिटीकर, पोहेकॉ/ दिपक ओढणे यांनी गुन्हयातील संशईत मयताचा मुलगा नामे 01. शेख यासेर अरफाद पिता शेख युनुस, वय 20 वर्षे व्यवसाय हॉटेल चालक राहणार दुल्लेशहा रहेमाननगर, वाघी रोड, महमुद फंक्शन हॉलचे पाठीमागे नांदेड यांचेकडे गुन्हया संबधाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने सांगीतले.

त्याचे मयत वडील हे त्यास व त्याची आईस मोठ्या प्रमाणावर मानसीक त्रास देत होते. त्यांना मारहान करीत होता तो त्रास असाहय झाल्या मुळे मयताच्या मुलांने त्याचा ओळखीच्या मित्र नामे शेख अमेर रा. चौफाळा नांदेड. यास वडील युनुस यांना मारण्याची सुपारी दिली होती. त्या माहीती वरुन आम्ही घटणास्थळाचे ठिकाणचे CCTV फुटेजची पाहीणी करुन गोपनीय बातमीदारा नेमण्यात आले. त्यांचे कडुन प्राप्त माहीतीचे आधारे व सायबर सेल नांदेड यांचे सहर्कायाने तांत्रीक माहीती हस्तगत केली.

त्या माहीतीच्या आधारे यातील आरोपीताचे नावे निष्पण करुन आरोपी नामे 02. शेख अमजद पिता शेख ईसाख, वय 24 वर्षे व्यवसाय काळी पिवळी जीप चालक राहणार आंबेडकरनगर (सिकंदरनगर) मनमाड ता.नांदगांव जि. नाशिक 03. योगेश शिवाजी निकम, वय 24 वर्षे व्यवसाय गवंडी मिस्त्रीकाम राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक मनमाड, पोलीस ठाणे मनमाड तालुका नांदगांव जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे गुन्हया संबंधाने विचारपुस करता त्यांनी खुन केल्याची कबुली दिल्याने तपास अधिकारी सपोनी श्री प्रशांत लोंढे यांनी अटक करुन तिन आरोपीना आज रोजी मा. न्यायालयात पी.सी.आर. कामी हाजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक 10/09/2024 रोजी पर्यंत पि.सी.आर. मंजुर केला आहे. गुन्हयाचा अधिक तपास करीत आहोत. वर नमुद अज्ञात खुनाचा गुन्हा उघड करुन चांगली कामीगी केल्याने वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!