करियरनांदेड

Voice of media ; व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार यांची निवड -NNL

किनवट| व्हॉइस ऑफ मीडिया किनवट शाखेची बुधवारी (४ डिसेंबर) वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. सदर बैठकीत नविन कार्यकारीणी तयार करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार तर सचिवपदी सुरेश कावळेंसह सर्व पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी आणि इत्तर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी शिक्कामोर्तब केला.

व्हाॅईस आँफ मीडियाच्या किनवट तालुका शाखेची ४ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या गोकुंदा येथिल विश्रामगृहात वार्षिक सर्व साधारण सभा जगदीश सामनपेल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मागिल वर्षभरातील कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. तदोपरांत २०२४-२०२५ एक वर्षासाठी कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून दुसर्‍यांदा जगदीश सामनपेल्लीवार तर सचिव म्हणून सुरेश कावळेंची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष संतोष सिसले आणि उपाध्यक्ष विवेक ओंकार, सहसचिव सम्यक सर्पे, सहसचिव दत्ता जायभाये, कोषाध्यक्ष अनिल भंडारे, सदस्य प्रशांत सातूरवार, संतोष अनंतवार, शुभम शिंदे, सल्लागार – बी.एल.कागणे, मिलींद सर्पे, शकील बडगुजर, गोकुळ भवरे, आशिष देशपांडे यांची आवाज मतदान व हातवरती करून निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी नांदेड. जिल्हा कार्यकारणी अविनाश चमकुरे, डॉ .प्रवीणकुमार सेलूकर, डॉ. भगवान सूर्यवंशी, आदींची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!