नवीन नांदेड l नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात नशा युक्त गोळ्या व औषधी विक्री व पुरवठा करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी नांदेड जिल्हा धिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व अन्न व औषधी प्रशासन विभाग नांदेड यांना शिवमहासंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हाध्यक्ष आंनद पाटील जाधव व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.


जिल्हाधिकारी नांदेड येथे 22 जूलै रोजी नांदेड शहरात व जिल्ह्यात नशा युक्त गोळ्या व औषधी नांदेड शहरातील मेडीकल स्टोअर्स वर विना परवाना मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे ,त्यामुळे नाबालक युवक गुन्हेगारी प्रवृत्त होत आहे.

त्यामुळे या सर्व मेडीकल स्टोअर्स ची चौकशी आणि त्यांना जो कोणी मोठ्या प्रमाणात नशा गोळ्या व औषधी पूरवठा करत आहे त्याचावर चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवमहासंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा युवा जिल्हाध्यक्ष आनंद पाटील जाधव , माधव पाटील टेकाळे ,नामदेव चिंतले गणेश पाटील वडजे,अमोल पाटील जाधव ,साईनाथ पाटील घोरबांड,
केशव पाटील वानखेडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



