नांदेड| नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने चैन स्नॅचिंगच्या दहा गुन्हयामध्ये वाँटेड असलेल्या अंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास जेरबंद करुन चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंगचे असे पाच गुन्हे उघड करुन ५०,०००/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मागील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे व पाहीजे, फरारी आरोपीचा शोध घेणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने ओमकांत चिंचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व पथकातील अंमलदार हे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत पेट्रोलींग साठी निघाले. यावेळी त्यांना गोपनीय माहीती मिळाली की, चोरी, घरफोडी करणारा एक आरोपी चोरीच्या मोटार सायकलसह एम. आय.डी.सी. बळीरामपुर भागात संशयीतरित्या थांबलेला आहे.

त्यावरून गुन्हे शोध पथकाने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता अमन इक्वाल हुसेन उर्फ पटेल वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. मस्तानपुरा विष्णुनगर नांदेड येथील असल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातून एक चोरीची हीरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल किंमत अंदाजे 50,000/- रुपयाची जप्त करण्यात आली. आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केला असता तो आणी त्याचे इतर साथीदार अमन जोगदंड रा. नांदेड, जुबेर उर्फ जेडी रा. वाजेगाव ता.जि. नांदेड व अरबाज उर्फ माया रा. बासर यांनी मिळुन नांदेड ग्रामीण, धर्माबाद, बोधन राज्य तेलंगणा आदी ठिकाणी अनेक गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी केलेल्या कामगीरीचे अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.



