नांदेडक्राईम

Journalist Protection Act : पत्रकार अजित पवार मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा -NNL

नांदेड| मुखेड तालुक्यातील बार्‍हाळीचे पत्रकार अजित पवार यांना बातमी लावण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेशकुमार वडदकर व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुखेड तालुक्यातील भवानी तांडा येथील रहिवाशी तथा दै.पुढारीचे बार्‍हाळी प्रतिनिधी अजित शंकरराव पवार यांना दि.22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास बातमी प्रकाशीत करत असल्याचा राग मनात धरून नदीम पाशा अहमद तांबोळी, गंगाधर गोरसटवार यांच्यासह इतर दोन जणांनी त्यांची मोटारसायकल अडवून अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IMG 20241024 WA0014 1 Journalist Protection Act : पत्रकार अजित पवार मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा -NNL

परंतू पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकारांच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, अनुराग पोवळे, राजु झंवर, प्रशांत गवळे, सुरेश आंबटवार, श्रीधर नागापुरकर, प्रा.डॉ.प्रविणकुमार सेलुकर, प्रा.राज गायकवाड, संजय धरमुरे, उमेश पाटील गोजेगावकर यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!