हिमायतनगर| तालुक्यातील सवना ज. भागातील पाचशिव महादेव देवस्थान यात्रेत आरोग्य विभागाने उपहार गृहात ठेवण्यात आलेले पिण्याचे पाण्याचे पाण्याची तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, यात्रेकरूंना शुद्ध पेयजल उपलब्ध करून दिल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली आहे.
नांदेड जिह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव महादेव मंदिर देवस्थान यात्रा महोत्सवास सुरूवात झाली आहे. तब्बल चार दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात अनेक हाॅटेल्स ,उपहार गृह थाटण्यात आले असून, पंचक्रोशीतील भाविक भक्त यात्रेकरू या यात्रेत सहभागी होतात. जिलेबी, भज्जी या यात्रेत फेमस आहेत. चांगले चवदार पदार्थ मिळत असल्याने यात्रेकरू या उपहार गृहातील अन्न पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठी गर्दि करतात. येथे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून यात्रा कमेटी काळजी घेत असतेच, तसेच स्थानिक आरोग्य विभाग ही जागरूकपणे काम करीत आहे.
चिंचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असल्याने येथील तालूका आरोग्य अधिकारी डॉ. धम्मपाल मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोर्डीचे वैद्यकीय अधिकारी जनार्दन टारफे यांच्या पुढाकारातून पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला यात्रेकरूकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रा कमेटीचे अध्यक्ष सवना गावचे सरपंच परमेश्वर गोपतवाड, यांनी आरोग्य विभागाच्या मोहिमेचे कौतुक केले.
यावेळी उपसरपंच सिद्धार्थ राऊत, संतोष अनगुलवार, आनंदा बोनलवार, तालूका सुपर वायझर राजू नागमवाड, आरोग्य सुपर वायझर पंडीत चौथमल, आरोग्य सेवक सुमित कांबळे, आरोग्य सेवक अशोक गायकवाड, शेख नादर, सचिन राठोड, बाळू लोखंडे, माधव वागतकर आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.