नांदेडराजकीय

BJP : भाजपा संघटनमंत्री कोडगे यांचा वाढदिवस निमित्ताने विद्यार्थ्यांना वही, पेन, रुग्णांना फळ वाटप

हिमायतनगर| भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर भाजपातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत व्हावे यासाठी मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कोडगे काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानात नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यान कडून उत्कृष्ठ काम करून घेतल्यामुळे ते सर्व परिचित झाले आहेत. दिनांक 22 एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने हिमायतनगर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या पुढाकारातून शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील 500 विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून तेथील एकल पालकांचे पालकत्व स्वीकारले आहे.

असेच हिमायतनगर येतील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून संजयजी कोडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष गजानन चायल, शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, रुपेश नाईक, पाकलवाड सर, प्रकाश सेवनकर, दुर्गेश मंडोजवार, परमेश्वर नागेवाड, विशाल शिंदे, प्रशांत ढोले, भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button